Sunday, November 14, 2021

जमावाची जात,रंग,भाषा आणि धर्म

जमावाची जात,रंग,भाषा

आणि धर्म


माझ्या मुलाचा प्रश्न

बाबा कळतच नाही हो या

जगात कसं जगायचं ते?

मी म्हटलं सोपं आहे

बारा रंग असलेला मोठा

शेला ठेव सोबतीला

समोरच्या जमावाचा

रंग पाहून  नेमका तोच

रंग तुला सामोरा करता

आला पाहिजे 

आणि देता आला पाहिजे त्यांचाचं नारा...

समोरच्या जमावाचीचं

भाषा बोलता आली

पाहिजे तुला आता ...

वेगवेवेगवेगळे रंग ठेव

सोबतीला...

फक्त फेकता आला

पाहिजे नेमका जमावाचाचं

रंग जमावावर..

आणि हो ,

सर्वधर्मसमभावाचे

आपले विचार ठेवायचे

असतात आपल्याजवळचं

कारण आजकाल ही

अंधश्रद्धा आपल्याला 

परवडण्यासारखी नाही रे....

आणि नेहमी लक्षात ठेवायचं...



जमावाला असतो रंग...

जमावाला असते जात ...

जमावाला असतो धर्म ...

आणि हो जमावाला

असते भाषा...

आणि जमावच्या डोक्यात

असते एके फोर्टीसेव्हन एवढी क्रूरता...

गोपालभौ खाडे इचुकाट्यावाले 7798697369